ई – पिक पाहणी बाबत शासन निर्णय
ई – पिक पाहणीबाबत शासनाचा मोठा निर्णय शेतकऱ्यांसाठी एक नवीन सुविधा 2025
मागील काही वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी विविध शासनाच्या मार्फत राबविण्यात जात आहे. त्यापैकी ई पिक पाहणी आहे. अनेक शेतकऱ्यांना प्रश्न होते की एक रुपयात पीक विमा योजना बंद आल्यानंतर ई पाहणी करणे गरजेचे आहे की नाही?
ई – पिक पाहणी कशी करावी त्याच पद्धतीने कोणत्या प्रकारच्या सुविधा शासनामार्फत शेतकऱ्यांना पुरविल्या आहेत हे खालील प्रमाणे जाणून घेऊया.
शासनाच्या माध्यमातून 27 जून 2025 रोजी देण्यात आलेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांना 27 जून 25 मध्ये आता खरीप हंगामासाठी पिक पाहणी करणे बंधनकारक आहे. ही पिक पाहणी DCS या आपलिकेशन च्या माध्यमातून केली जाणार आहे परंतु यामध्ये एक मोठा प्रश्न असा आहे की, ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यांकडे मोबाईल नसणे व असला तरी पीक पाहणी कशी करावी याबद्दल पुरेसे ज्ञान नसणे, त्यामुळे कित्येक शेतकरी वर्ग पिक पाहणी करू शकत नाही. त्यामुळे शासनाच्या माध्यमातून अशा शेतकऱ्यांसाठी एक सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
शेतकऱ्यांची पिक पाहणी करण्यासाठी तलाठी सोबत एक सहायक नेमवले जातात . व त्यांच्या माध्यमातून गावातील जे क्षेत्र पाहणी असून वंचित आहे त्या क्षेत्राची पिक पाहणी केली जाते व त्या साहित्यांना प्रति प्लॉट दहा रुपये एवढे मानधन दिले जाते. ज्या शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून पिक पाहणी करणे शक्य नाही त्या शेतकरी वर्गाला सहाय्यकाच्या माध्यमातून ई पीक पाहणी करून घेणे गरजेचे आहे