नांदेड मधील पिक विमा घोटाळा

प्रधानमंत्री पिक विमा योजना ही केंद्र शासनाची एक महत्व पूर्ण योजना आहे.
महाराष्ट्रातील लाखो शेतकरी या योजनेचा लाभ घेत असतात.पण मागील काही वर्षापासून या योजने मध्ये गैरप्रकार घडतांना दिसत आहेत. असाच एक प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. बीड जिल्ह्यातील बोगस पीक विमा घोटाळा राज्यभर गाजल्यानंतर सोमवारी रात्री नांदेड जिह्यात सुद्धा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.नांदेड जिल्ह्यात सन 2024 पासून तब्बल 4 हजार 453 शेतकऱ्यांच्या 40 सेतू सुविधा चालकांनी बोगस विमा उतरविला आहे.
विशेष महत्त्वाचे म्हणजे त्यात नऊ सुविधा केंद्र ही बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील आहेत.तर काही सेतू चालकांनी उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या नावाने पीक विमा भरला आहे.
सध्या या सुविधा चालकांवर गुन्हा नोंदविण्यात आला असून जिल्ह्यात आणखी प्रकरणे उघडकीस येण्याची दाट शक्यता आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना ही शासन आणि युनायटेड इंडिया इन्शुरन्स या कंपनी कडून चालविली जाते.2024 पासून काही सुविधा चालकांनी शासकीय जमीन संस्थांच्या नावावर असलेल्या, करारनामा,संमतीपत्र नसलेल्या जमिनीवर शेतकऱ्याच्या नावे पीक विमा उतरविला होता.पडताळणीत ही संख्या 4 हजार 453 एवढी असून त्यात 40 सेतू सुविधा केंद्र चालकांची नावे समोर आली आहेत.परभणी, नांदेड,जालना, पुणे, लातूर परळी तसेच उत्तरप्रदेशातील सुविधा चालकांचा पण समावेश आहे