Crop Insurance : खरीप हंगामातील ४०० कोटी थकीत; पीक विम्याची भरपाई पुढील १५ दिवसांत मिळणार

Crop Insurance : खरीप हंगामातील ४०० कोटी थकीत; पीक विम्याची भरपाई पुढील १५ दिवसांत मिळणार

Insurance Delay: सन 2024 खरीप हंगामातील  राज्य शासनाने आपल्या वाट्याचे 400 कोटी आणि रब्बी 2024-25 मधील 207 कोटी रुपयांची विमा भरपाई रखडली आहे.

राज्य शासनाने आपल्या वाट्याचा विमा हप्ता थकवला आहे.खरीप 2024 मधील 400 कोटी तर रब्बी 2024-25 मधील 207 कोटी रुपयांची शेतकऱ्यांची  विमा भरपाई रखडली आहे. तसेच शेतकऱ्यांना खरीप आणि रब्बी 2023-24 मधील 262 कोटी रुपये मिळणे बाकी आहेत ही रक्कम पुढील 15 दिवसात वितरित केली जाईल असे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितले आहे.

पिक विम्याचा मुद्दा विधिमंडळाच्या अधिवेशनात खूप जोरात गाजत आहे.

पीक विमा मंजूर झाल्यापासून 10 दिवसांच्या आता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची तरतूद आहे.परंतु विमा कंपन्यांनी हा नियम धाब्यावर बसवलं आहे.राज्य शासन आपल्या वाट्याचा विमा हप्ता वेळेवर देत नाही.त्यामुळे शेतकऱ्याला विम्याची नुकसान भरपाई वेळेवर मिळता नाही.

 

Leave a Comment